Operation Sindoor वर अमित शहांचे लोकसभेतील उत्तर म्हणजे ब्लेम गेम; विरोधकांचा आरोप

Operation Sindoor वर अमित शहांचे लोकसभेतील उत्तर म्हणजे ब्लेम गेम; विरोधकांचा आरोप

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा सुरू आहे. गृहमंत्री अमित शहा चर्चेत सहभागी झाले. पाकव्याप्त कश्मीर ही काँग्रेसची चूक होती, असे यावेळी शहा म्हणाले. तसेच त्यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांवर हल्ला चढवला. त्यामुळे शहा यांचे संबोधन म्हणजे ब्लेम गेम असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

अमित शहा यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. अमित शहा म्हणाले की, 7 मे रोजी पहाटे 1.26 वाजता कारवाई संपली. आपल्या डीजीएमओने पाकच्या डीजीएमओला सांगितले की, आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. दहशतवादी तळांवर आपण केलेला हल्ला पाकिस्तानने स्वतःवर हल्ला मानला. त्यांनी ही चूक केली. दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांसाठी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता आणि उच्च सैन्य अधिकारी तेथे उपस्थित होते. आणि त्यांनी दहशतवाद्यांना खांदाही दिला. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघड केले की, पाकिस्तानचा दहशतवाद हा सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे. 8 मे रोजी पाकिस्तानने आपल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण एकही क्षेपणास्त्र तळांवपर्यंत पोहोचू शकले नाही.

हिंदुस्थानची विमाने पाकिस्तानने पाडली काय?‘ऑपरेशन सिंदूर’वरून लोकसभेत घमासान… विरोधकांनी सरकारला घेरले!

अमित शहा म्हणाले की, हे निवडणुकीचे भाषण म्हणून बघात असाल त्याच्या समजुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल. हे निवडणूक भाषण नाही तर, देशातील 140 कोटी लोकांच्या भावना आहेत. 30 एप्रिल रोजी झालेल्या सीसीएसच्या बैठकीत मोदीजींनी सैन्याला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर करण्यात आले आणि नऊ दहशतवादी अड्डे पूर्णपणे नष्ट करण्यात आले. हा एक प्रतिबंधित हल्ला नव्हता. आम्ही नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पण एकही नागरिक मृत्युमुखी पडला नाही. फक्त दहशतवादी मारले गेले. यावेळी आम्ही 100 किमी आत घुसून हल्ला केला.

अमित शहा म्हणाले की, 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 26 नागरिक मारले गेले. मी त्याच दिवशी श्रीनगरला निघालो. पंतप्रधान मोदींनी 23 आणि 24 एप्रिल रोजी सीसीएसची बैठक घेतली. यामध्ये सिंधू पाणी करार पुढे ढकलण्यात आला, जो काँग्रेसचा एक घोटाळा होता. सीसीएसने ठरवले की दहशतवादी जिथे लपले असतील तिथे त्यांना आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असा निर्णय सीसीएसच्या बैठकीत घेण्यात आला.

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशीम मुसासह तिघे ठार,संसदेत चर्चा सुरू झाल्यावर सरकारचा दावा

गृहमंत्र्यांचे भाषण म्हणजे ब्लेम गेम- कनिमोझी

द्रमुक खासदार कनिमोझी म्हणाल्या की, भाजपने पहिल्यांदाच विरोधी पक्षावर विश्वास ठेवला आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परदेशात गेलेल्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश केला. यासाठी आम्ही सरकारचे आभार मानतो. पण असे का घडले? गृहमंत्री बोलत होते, ब्लेम गेम करत होते. तुम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आहात आणि इतरांवर आरोप करत आहात. गृहमंत्री काल म्हणत होते की, तुम्ही 20 वर्षे तिथेच राहाल. जनता सर्वोच्च आहे. आम्ही येथे आहोत कारण SIR सारख्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणता की तुम्ही विश्वगुरू आहात. मोदी सरकारच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची मोजणी करताना कनिमोझी म्हणाल्या की, तुमच्याकडे याचे उत्तर नाही. प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता की, हे पुन्हा होणार नाही. विश्वगुरू कोणालाही काहीही धडा शिकवत नाहीत. याची जबाबदारी कोण घेईल?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनुके की काळे मनुके… कोणत्या मनुक्यात आहेत जास्त पोषक घटक? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता? मनुके की काळे मनुके… कोणत्या मनुक्यात आहेत जास्त पोषक घटक? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता?
ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. काजू आणि बदामांपासून ते मनुकापर्यंत ते आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. काही ड्रायफ्रूट्सचे स्वरूप...
वयाच्या 67 व्या वर्षी आजही ‘या’ अ‍ॅक्शन हिरोच्या दारात निर्मात्यांची रांग
Santosh Deshmukh Case – मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण
Ratnagiri News – चिपळूण शहरात डॉक्टरच्या 22 वर्षांच्या मुलाने जीवन संपवले; कारण अद्याप अस्पष्ट
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महायुती सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम, प्रकाश आंबेडकरांचे ट्विट
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त फक्त नावालाच! अंबादास दानवे यांचा घणाघात
खड्ड्यांमुळे अपघात घडून बळी गेल्यास अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरणाला तंबी