लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, त्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, त्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे 4 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे? 14 हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती छाननीमध्ये उघड झाली आहे. प्रस्तुत घोटाळ्यासाठी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून, या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आई-वडिलानंतर भाऊ-बहिणीचे नाते हे सर्वात पवित्र असते. पण महाराष्ट्र सरकारने या नात्याचाही अवमान केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटींचा घोटाळा झाला. त्यामुळे सरकारने या योजनेची श्वेतपत्रिका काढावी, संपूर्ण व्यवहाराचे ऑडिट करावे व या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. हा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे. सरकारने या प्रकरणी चौकशी केली नाही तर आम्ही हा विषय संसदेत मांडून केंद्राकडे या योजनेच्या चौकशीचा आग्रह धरू, असे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यातील 2 कोटी 38 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यातील 26 लाख अर्थात 10 टक्के महिला पहिल्या टप्प्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अपात्र ठरवण्यात आल्या. या योजनेत पुरुषांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, बँकेचे डिटेल्स आदी पुरावे लागतात. मग या पुरुषांच्या खात्यावर पैसे कसे गेले? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एखाद्या महाविद्यालयात कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होतात. विमा योजनेसाठी शेतकरी अर्ज भरतात ते ही रद्दबातल होतात. मग लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी भरलेले अर्ज का रद्द झाले नाहीत? डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानात ही चूक कशी झाली? विधानसभा निवडणुकीच्या 3 महिने अगोदर ही योजना आणली गेली. त्यानंतर सर्वांना लाभ देण्यात आले. मग त्यांना आत्ताच अपात्र का ठरवले गेले? हा थोडा थोडका नव्हे तर तब्बल 4 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारचा दावा आहे की त्यांचा महिला विभाग सर्वोत्तम आहे, तर मग इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार कसा झाला? या योजनेच्या अंमलबजावणीत चुकीच्या पद्धती वापरल्या गेल्या असतील, तर त्याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे. मी अदिती तटकरे यांच्यावर आरोप करणार नाही. परंतु योजनेच्या अंमलबजावणीत पुढाकार घेणारे मंत्री व उपमुख्यमंत्री यांना याची जबाबदारी घ्यावी लागेल, असेही सुप्रियासुळे यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनुके की काळे मनुके… कोणत्या मनुक्यात आहेत जास्त पोषक घटक? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता? मनुके की काळे मनुके… कोणत्या मनुक्यात आहेत जास्त पोषक घटक? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता?
ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. काजू आणि बदामांपासून ते मनुकापर्यंत ते आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. काही ड्रायफ्रूट्सचे स्वरूप...
वयाच्या 67 व्या वर्षी आजही ‘या’ अ‍ॅक्शन हिरोच्या दारात निर्मात्यांची रांग
Santosh Deshmukh Case – मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण
Ratnagiri News – चिपळूण शहरात डॉक्टरच्या 22 वर्षांच्या मुलाने जीवन संपवले; कारण अद्याप अस्पष्ट
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महायुती सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम, प्रकाश आंबेडकरांचे ट्विट
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त फक्त नावालाच! अंबादास दानवे यांचा घणाघात
खड्ड्यांमुळे अपघात घडून बळी गेल्यास अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरणाला तंबी