Operation Sindoor Debate – जगातील कुठल्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखले नाही, पंतप्रधान मोदींचा दावा; ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले
लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी लोकसभेत जवळपास 2 तास भाषण केले. 1 तास 42 मिनिटांचे लांबलचक भाषण त्यांनी केले. संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटांना भाषण सुरू झालेले त्यांचे भाषण 7 वाजून 56 मिनिटांनी सांपले. या भाषणात पंतप्रधान मोदींनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर टीका केली. तसेच हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्धविरामावर थेट उत्तर देणे टाळले. जगातील कुठल्याही देशाने हिंदुस्थानला कारवाई करण्यापासून रोखले नाही. जगातील कुठल्याही नेत्याने ऑपरेश सिंदू रोखले नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेणे जाणीव पूर्वक टाळले.
संसदेचं हे पावसाळी अधिवेशन हिंदुस्थानच्या विजयोत्सवाचे सत्र आहे. हिंदुस्थानच्या गौरवगानचे सत्र आहे. हा विजयोत्सव दहशतवाद्यांची हेडक्वॉटर्स जमीनदोस्त करण्याचा, हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा आहे, हिंदुस्थानच्या सैन्याचे शौर्य आणि सामर्थ्याचा आहे, हा विजयोत्सव 140 कोटी हिंदुस्थानींची एकता, इच्छाशक्ती आणि त्यांच्या अप्रतीम विजयाचा हा विजयोत्सव आहे. याच विजयी भावानेने हिंदुस्थानची बाजू मांडण्यासाठी उभा आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.
पंतप्रधान मोदींनी भाषणात ऑपरेशन सिंदूरमध्ये हिंदुस्थानच्या सैन्याने केलेल्या कारवाईची माहिती. ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांच्या आकांची आजही झोप उडाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. बहावलपूर आणि मुरिदके येथील तळेही जमीनदोस्त केली. पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला आम्ही खोटे ठरवले. आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला हिंदुस्थान कधीच झुकणार नाही, हे दाखवून दिले. पाकिस्तानच्या सैन्य तळांचे मोठे नुकसान झाले आणि अजूनही त्यांचे अनेक हवाई तळ आयसीयूमध्ये आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
9 मे रोजीची मध्यरात्री आणि 10 मे रोजीच्या पहाटे हिंदुस्थानची क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात प्रचंड प्रहार केला. ज्याची पाकिस्तानने कधी कल्पनाही केली नव्हती. पाकिस्तानला गुडघे टेकवण्यास भाग पाडले. पाकिस्तानने फोन करून हल्ला रोखण्याची डीजीएमओसमोर विनवणी केली. आमची कारवाई ही दहशतवाद्यांविरोधात आहे, हे स्पष्ट केले. जगातील कुठल्याही नेत्याने हिंदुस्थानला ऑपरेशन सिंदूर रोखण्यास सांगितले नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. 9 मे रोजी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ते तासाभरापासून प्रयत्न करत होते. पण सैन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. त्यामुळे त्यांचा फोन घेऊ शकलो नाही. नंतर मी त्यांना फोन केला. त्यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती फोनवर म्हणाले, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावर मी उत्तर दिले, पाकिस्तानने हा इरादा असेल तर त्यांना खूप महागात पडेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
परराष्ट्र धोरणावरही चर्चा झाली. जगभरातील समर्थनावरही चर्चा झाली. सभागृहाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, जगातील कुठल्याही देशाने हिंदुस्थानला आपल्या सुरक्षेत कारवाई करण्यापासून रोखले नाही. संयुक्त राष्ट्रांत 193 देशांपैकी फक्त तीन देशांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली होती. क्वॉड असो, ब्रिक्स असो, फ्रान्स, रशिया, जर्मनी या कुठल्याही देशाचे नाव घ्या. तमाम देशांकडून, जगभरातून हिंदुस्थानला समर्थन मिळाले. हिंदुस्थानला समर्थ मिळाले. पण देशाच्या शूरवीर जवानांच्या पराक्रमाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही, अशी टीका यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List