दुबई-मुंबई स्पाइसजेट विमानात प्रवाशाचा कारनामा, ई-सिगारेट ओढल्याप्रकरणी मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

दुबई-मुंबई स्पाइसजेट विमानात प्रवाशाचा कारनामा, ई-सिगारेट ओढल्याप्रकरणी मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

दुबईहून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेट एअरलाइन्सच्या विमानात धक्कादायक घटना समोर आली आहे. विमान मिडएअर असताना एक प्रवासी ई-सिगारेट ओढत होता. क्रू मेंबर्सच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रवाशाकडून ई-सिगारेट जप्त केली. यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुर्तजा रली खान असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून मुंबईला येणारे स्पाइसजेट विमान क्रमांक SG-60 हे मिड एअर असताना एका प्रवाशाने शौचालयात बसून सिगारेट ओढण्यास सुरुवात केली. केबिन क्रू सदस्य महेश यांना शौचालयातून सिगारेटचा वास आला. त्यांनी याबाबात चौकशी केली असता सीट 1 के वर बसलेल्या मुर्तजा खान या प्रवासाने शौचालयात ई-सिगारेट ओढल्याचे समोर आले.

महेशने मुर्तजा खानकडे विचारपूस केली असता त्याने ई-सिगारेट ओढल्याचे कबूल केले आणि हिरवी ई-सिगारेट दाखवली. क्रू मेंबरने ती सिगारेट जप्त केली. महेशने पायलटला घटनेची माहिती दिली. मग पायलटने विमानतळ अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली.

स्पाईसजेट एअरलाइन्सचे ड्युटी मॅनेजर चंद्रकांत सोनवणे यांनी मुर्तजा खानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सहार पोलिस ठाण्यात मुर्तजा खानविरुद्ध बीएनएसच्या कलम 125 आणि विमान नियम 1937 च्या कलम 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानला पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनुके की काळे मनुके… कोणत्या मनुक्यात आहेत जास्त पोषक घटक? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता? मनुके की काळे मनुके… कोणत्या मनुक्यात आहेत जास्त पोषक घटक? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता?
ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. काजू आणि बदामांपासून ते मनुकापर्यंत ते आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. काही ड्रायफ्रूट्सचे स्वरूप...
वयाच्या 67 व्या वर्षी आजही ‘या’ अ‍ॅक्शन हिरोच्या दारात निर्मात्यांची रांग
Santosh Deshmukh Case – मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण
Ratnagiri News – चिपळूण शहरात डॉक्टरच्या 22 वर्षांच्या मुलाने जीवन संपवले; कारण अद्याप अस्पष्ट
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महायुती सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम, प्रकाश आंबेडकरांचे ट्विट
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त फक्त नावालाच! अंबादास दानवे यांचा घणाघात
खड्ड्यांमुळे अपघात घडून बळी गेल्यास अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरणाला तंबी