वेस्टर्न एक्सप्रेस मार्गावरील सर्विस रोडवर गॅरेज आणि सलून, अतिक्रमण हटवण्यासाठी कधी होणार कारवाई? वरून सरदेसाई यांचा सवाल
वेस्टर्न एक्सप्रेस मार्गालगतच्या सर्विस रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरून सरदेसाई यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुटपाथवर उभे राहिलेल्या गॅरेज आणि हेअर कटिंग सलूनमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून, यावर महापालिका कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विधानसभेतील आपल्या भाषणात सरदेसाई म्हणाले, “माझ्या मतदारसंघात महापालिकेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. वेस्टर्न एक्सप्रेस मार्गाच्या सर्विस रोडवरील फुटपाथवर गॅरेज आणि सलून उभे राहिले आहेत. याबाबत वारंवार वॉर्ड ऑफिस, महानगरपालिका आयुक्त आणि डीपीडीसीकडे तक्रारी केल्या, तरी अतिक्रमण हटवण्यात आले नाही.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जे अधिकारी कारवाईत टाळाटाळ करतात, त्यांच्यावर कोणती कारवाई होणार?”
सरदेसाई यांनी पुढे सांगितले की, अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक लोकांचा, विशेषतः महिलांच्या गटाचा विरोध होतो, ज्यामुळे कारवाई तात्पुरती थांबते. अधिकारी सांगतात की, लोकांचा मोठा विरोध झाल्याने अतिक्रमण तोडता आले नाही. पण यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दोन-दोन तास वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो” या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List