इंजीनिअर तरुणाने ऑफीसची मिटींग अर्ध्यावरच सोडली…अन् उचलले टोकाचे पाऊल
पुण्यातील 23 वर्षांच्या इंजीनिअर तरुणाने ऑफीसच्या इमारतीतून उडी घेत मृत्यूला कवटाळले आहे. त्याच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोमद करण्यात आली आहे. मृत्यूपुर्वी त्याने चिठ्ठी लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पियुष अशोक कवाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या जुलैपासून पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधील अॅटलास कॉप्को (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत होता.
पुण्यातील ऑफीसमध्ये बैठक सुरू होती. त्यावेळी पियुष बैठक अर्ध्यावरच सोडून निघून गेला. त्यानंतर त्याने ऑफीसच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्याने कंपनीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. त्याने मृत्यूपूर्वी त्याच्या कुटुंबासाठी एक चिठ्ठी सोडली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
या तरुणावर कामाचा ताण होता का, याबाबत पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे म्हणाले: प्रथमदर्शनी अद्याप असे काहीही आढळलेले नाही. याबाबत तपास सुरू आहे, परंतु तरीही त्याने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे याची सखोल चौकशी केली जाईल. त्याचे नातेवाईक इत्यादी माहिती घेण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List