Mumbai News – उपनिबंधक पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीचं टोकाचं पाऊल, राहत्या घरीत जीवनयात्रा संपवली

Mumbai News – उपनिबंधक पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीचं टोकाचं पाऊल, राहत्या घरीत जीवनयात्रा संपवली

घरगुती भांडणाला कंटाळून म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील कांदिवली आकुर्ली परिसरात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी समता नगर पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. रेणु कटरे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रेणु भावाने त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

रेणु या शिक्षिका होत्या तर त्यांचे पती बापू कटरे हे म्हाडामध्ये उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघा पती-पत्नीमध्ये आर्थिक कारणांवरून नेहमी वाद होत असत. शनिवारी उशिरा नेहमीप्रमाणे त्यांच्यात भांडण झाले. हे भांडण टोकाला गेले आणि त्यानंतर रेणु यांनी गळफास घेत जीवन संपवले.

बापू कटरे हे आपल्या बहिणीचा छळ करत होते. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड. नितीन शेवाळ यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मग मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. समता नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास करत आहेत. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;