बोगस तणनाशके बनविणाऱ्या टोळीला अटक, सातारा जिह्यात साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

बोगस तणनाशके बनविणाऱ्या टोळीला अटक, सातारा जिह्यात साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

शेतीसाठी बनावट तणनाशके बनवणाऱ्या सहाजणांच्या टोळीला सातारा शहर पोलिसांनी जेरबंद केले असून, 12 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. करंजे नाक्यावर बनावट तणनाशके घेऊन जाणारा टेम्पो पकडल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. याप्रकरणी धैर्यशील अनिल घाडगे (कय 31, रा. शाहुपुरी सातारा), युवराज लक्ष्मण मोरे (वय 28, रा. रेकडी, ता. कोरेगाव), गणेश मधुकर कोलवडकर (वय 30, रा. धालवडी, ता. फलटण), नीलेश भगवान खरात (वय 38, जाधववाडी, ता. फलटण), तेजस बाळासा ठोंबरे (वय 30, रा. कडूज, ता. खटाव), संतोष जालिंदर माने (वय 45, रा. नडवळ, ता. खटाव) यांच्याकर गुन्हा दाखल
झाला आहे.

साताऱ्यातील करंजे नाका येथे शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करण्यासाठी काही लोक चारचाकी गाडीतून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सातारा पोलीस व डीबी पथकाने बनावट औषधांची खात्री करण्यासाठी टू-बडी कन्सल्टिंगचे सतीश तानाजी पिसाळ यांना सोबत घेऊन करंजे नाका येथे दुपारी चार काजता सापळा रचला. करंजे नाका येथे आलेला टेम्पो थांबवून सतीश तानाजी पिसाळ यांच्या मदतीने औषधे तपासली. त्यांनी औषधे बायर कंपनीचे ‘राऊंडअप’ असे नाव वापरून बनावट औषधे असल्याचे खात्रीशीर सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक ढमाळ यांनी गाडीसह चालकास ताब्यात घेतले क जागीच पंचनामा केला. यावेळी 2 लाख 6 हजार 700 रुपयांच्या बनावट औषधाच्या एकूण 260 बॉटल व 1 लाखाचा छोटा टेम्पो जप्त केला. यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्यात कॉपी राईट कायदा, ट्रेड मार्क कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उर्वरित संशयितांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ करीत आहेत.

सातारा जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी, अपर अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीक नवले, निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस अधिकारी ढेरे, उपनिरीक्षक ढमाळ व अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, जोतिराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, जयवंत घोरपडे यांनी ही कारवाई केली.

चालकाच्या चौकशीनंतर उर्वरित संशयित ताब्यात

चालकाकडे चौकशी केल्यानंतर 6 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रेवडी (ता. कोरेगाव), फलटण व वडूज (ता. खटाव) येथील कारखान्यातून एकूण 12 लाख 59 हजार 370 रुपयांचे बायर कंपनीचे बनावट राउन्डअप औषधे व चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर
तुम्ही सोशल मीडिया आणि अनेक सेलिब्रिटींना असे म्हणताना ऐकले असेल की रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते....
Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!
IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या
केरळच्या मुख्यमंत्री निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची मिळाली धमकी, पोलीस अलर्ट मोडवर