गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रफुल्ल लोढावर हनी ट्रपचा आरोप, एकनाथ खडसे यांच्या दाव्याने खळबळ

गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रफुल्ल लोढावर हनी ट्रपचा आरोप, एकनाथ खडसे यांच्या दाव्याने खळबळ

हनी ट्रपसह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 62 वर्षीय प्रफुल्ल लोढावर नोकरीचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लिल छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. पोस्कोसह बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जुलै रोजी प्रफुल्ल लोढाला अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

प्रफुल्ल लोढाच्या गुह्यांचा तपास करताना मुंबई पोलिसांनी जळगावच्या जामनेर आणि पहूर या ठिकाणी लोढा याच्या मालमत्तेची तपासणी केली. त्याचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांकडून जप्त करण्यात आले. दरम्यान, हा तपास त्याच्याकडे आणखी काही सीडी मिळतात का, हे शोधण्यासाठी होते. मात्र, त्याने ते कुठेतरी लपवून ठेवले असावेत, त्यामुळे पोलिसांना ते पुरावे हस्तगत करता आले नाहीत. एकेकाळी महाजन यांचा कट्टर विरोधक असणारा लोढा मधल्या काळात महाजनांचा विश्वासू बनल्याचा दावाही खडसे यांनी केला आहे. या आरोपामुळे खडसे व महाजन यांच्यातील वाद आणखी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

भाजपचा बडा नेता अडचणीत येणार

या लोढाने दिलेले काही आक्षेपार्ह फोटो आपण भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. दिल्लीतील भाजप नेत्यांनी त्याची गंभीर दखल घेत संतापही व्यक्त केला होता. मात्र, मधल्या कालखंडात ते फोटो गायब झाल्याचे खडसे म्हणाले. तर लोढा याच्याकडील आक्षेपार्ह साहित्य भाजपच्या एका बड्या नेत्याला अडचणीत आणू शकते. त्यामुळे पोलिसांकडून योग्य प्रकारे चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबईत पावसाची मुसळधार, विमानसेवेला फटका; इंडिगो, स्पाइसजेटकडून अ‍ॅडव्हायजरी जारी Mumbai News – मुंबईत पावसाची मुसळधार, विमानसेवेला फटका; इंडिगो, स्पाइसजेटकडून अ‍ॅडव्हायजरी जारी
आठवड्याची सुरवात मुसळधार पावसाने झाली असून यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सर्वत्र वाहतूक...
एक बटण दाबलं की देशात हाहाकार माजेल; हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसेंची उडी
अजित दादांची शिस्त ही माज दाखवणाऱ्यांना ‘समज’ देण्यापूर्तीच आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल
…मग शिक्षकांनी शिकवायचे कधी? बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर स्वयंपाकघरातच उपचार करा
पावसाळ्यात पीठ आणि तांदळात कीटक राहणार नाहीत, फक्त अशा प्रकारे साठवा
Bangladesh Plane Crash – बांगलादेशात हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले, पायलटचा मृत्यू; अनेक जण जखमी