फोनमध्ये नेटवर्क मिळत नसेल तर…
बऱ्याचदा फोनमध्ये नेटवर्क मिळत नाही. असं झालं तर फार चिंता करण्याची गरज नाही. काही सोपे उपाय करून फोनमधील नेटवर्क मिळवता येते.
सर्वात आधी फोनला रिस्टार्ट करा. कधी कधी फोनमधील किरकोळ समस्यांमुळे नेटवर्क मिळत नाही, पण फोन रिस्टार्ट केल्यास ही समस्या दूर होते.
मोबाईलमधील सिमकार्ड तपासून घ्या. कधी कधी सिमकार्ड सैल किंवा खराब होण्याची शक्यता असते. सिमकार्ड काढून ते स्वच्छ करा व व्यवस्थित लावा.
फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वायरलेस आणि नेटवर्क सेटिंग्ज तपासा. नेटवर्क ऑपरेटरऐवजी मॅन्युअली सिलेक्ट करा. कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता.
तुम्ही ज्या ठिकाणी आहात तेथे पुरेसे नेटवर्क उपलब्ध आहे की नाही हे तपासा.
कधी कधी कमी नेटवर्क कव्हरेज असलेल्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List