तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
तामिळनाडूमधील एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील चिन्ना कमानपट्टी गावात ही घटना घडली. स्फोटाचे कारण अद्याप कळले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि आपल्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.
स्फोट झाल्यानंतर कारखान्याला भीषण आग लागली. कारखान्यातून धुराचे लोट उठले होते. जखमींना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. महालिंगम, चेल्लाप्पंडियन, लक्ष्मी, रामामूर्ती, पुन्नीमूर्ती, रामाजयम, नागापंडी, वैरामणी आणि गांधी अशी मृतांची नावे आहेत. लिंगुसामी, मणिकंदन, करुप्पास्वामी, मुरुगलक्ष्मी आणि अझाकुराजा हे पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या शिवकाशी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List