बांगलादेश सरकार सत्यजित रे यांचे ढाका येथील वडिलोपार्जित घर पाडणार, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा; ममता बॅनर्जी यांची मागणी
बांगलादेशची राजधानी ढाका येथील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे वडिलोपार्जित घर पाडण्यात येत आहे. टेलिग्राफच्या वृत्तानुसार, हे ऐतिहासिक घर रे यांचे आजोबा आणि प्रसिद्ध लेखक उपेंद्र किशोर रे चौधरी यांचे होते. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी ते पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे आणि केंद्र सरकारला यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
हे घर ढाका येथील हरिकिशोर राय चौधरी रोडवर आहे आणि सुमारे 100 वर्षे जुने आहे. बांगलादेशच्या पुरातत्व विभागाच्या मते, फाळणीनंतर (1947) ही मालमत्ता सरकारच्या ताब्यात आली. पूर्वी ते मयमनसिंग बाल अकादमी म्हणून वापरले जात होते, परंतु अनेक वर्षांपासून ते दुर्लक्षित होते, ज्यामुळे ते जीर्ण झाले आहे.
याच बाबत X वर एक पोस्ट करत ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, “सत्यजित रे यांचे आजोबा, प्रसिद्ध साहित्यिक संपादक उपेंद्र किशोर रॉय चौधरी यांचे बांगलादेशातील मैमनसिंग शहरात असलेले वडिलोपार्जित घर पाडले जात असल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, पाडण्याचे काम आधीच सुरू झाले आहे. ही बातमी खूप दुःखद आहे. रे कुटुंब हे बंगाली संस्कृतीचे रक्षक आणि वाहक आहे. उपेंद्र किशोर हे बंगाली पुनर्जागरणाचे आधारस्तंभ आहेत. म्हणूनच, मला वाटते की, हे घर बंगालच्या सांस्कृतिक इतिहासाशी जोडलेले आहे. मी बांगलादेश सरकार आणि त्या देशातील सर्व हितचिंतक लोकांना या वारसा घराचे रक्षण करण्याचे आवाहन करेन. हिंदुस्थानी सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List