देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे; पुण्यात गुंडांचा धुडगू, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या लेकीवर हात टाकला; धक्काबुक्की, शिवीगाळ आणि बेदम मारहाण

देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे; पुण्यात गुंडांचा धुडगू, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या लेकीवर हात टाकला; धक्काबुक्की, शिवीगाळ आणि बेदम मारहाण

देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. पुण्यातील तळजाई टेकडीवर रोज सकाळी पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी येणाऱ्या लेकाRवर 50 ते 60 मस्तवाल पैलवान गुंडांच्या टोळक्याने आज हात टाकला. त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान, तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तालयावरही धडक दिली.

पुणे फिटनेस अकादमीच्या 150 ते 170 तरुण-तरुणी रोज पोलीस भरतीची तयारी करतात. दररोज तळजाई टेकडीवरील मैदानावर सराव करण्यासाठी येतात. आज नेहमीप्रमाणे हे तरुण-तरुणी सराव करीत होते. तत्पूर्वीच सरावाच्या मैदानात चार पैलवान थांबले होते. तरुण-तरुणींनी या चौघांना बाजूला होण्याची विनंती केली. मात्र त्यांनी तरुणींना धक्काबुक्की करीत तरुणांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन पोलीस अधिकारी आमचे मित्र आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाकडेही गेलात तरी आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही,’’ अशी धमकी पैलवानांसह त्यांच्या साथीदारांनी तरुण-तरुणींना दिली. दरम्यान, रात्री उशिरा सहकार नगर पोलीस ठाण्यात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

पाठलाग… मैत्रीसाठी धमक्या

  • सरावा वेळी संबंधित गुंड पैलवान अश्लील नजरेने पाहतात.
  • अनेकदा नको ती शेरेबाजी करतात.
  • फेसबुक, इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यासाठी वारंवार धमकी देतात.
  • रोज घरापर्यंत पाठलाग करतात.
  • धक्काबुक्की करत आमचा विनयभंग केला.

आरोपींना वाचवण्यासाठी मंत्रालयातून फोनाफोनी – लेशपाल जवळगे

‘‘राज्यातील विविध ग्रामीण भागांतील मुले पुण्यात अभ्यासाला येतात. मात्र अशा प्रकारच्या काही घटनांमुळे संबंधितांच्या मनावर आघात होतो. आरोपींना वाचवण्यासाठी थेट मंत्रालयातून पोलीस अधिकाऱयांना फोनाफोनी झाली. त्यामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पैलवानांविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही,’’ असा गंभीर आरोप ‘वंदे मातरम्’ संघटनेचे लेशपाल जवळगे यांनी केला आहे. ‘‘विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रात्रभर पोलीस आयुक्तालयाबाहेरच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहायचं?  इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहायचं? इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात आजारांनाही आमंत्रण मिळू शकते. खरंतर...
मखान्यापासून बनवा ‘या’ 2 दोन प्रकारच्या टेस्टी भाज्या, जाणून घ्या सोपी रेसिपी
ओट्सचे सेवन ‘या’ लोकांनी चुकूनही करून नये, शरीराला फायद्याऐवजी होईल नुकसान
नालासोपाऱ्यात पोलीस स्टेशनमध्येच ढिश्युम ढिश्युम, दोन गटात तुफान राडा
Weight Loss Fruit – वजन कमी करण्यासाठी हे एक फळ आहारात न विसरता समाविष्ट करा
भाजप नेत्याची जीभ घसरली; दिग्विजय सिंह यांचा केला मौलाना असा उल्लेख
झारखंडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार, एक जवान शहीद