Ratnagiri News – कोकणात पावसाचा जोर कायम, राजापूरात नद्यांची पाणी पातळी वाढली
गेल्या दोन दिवसांपासून राजापूर तालुक्यामध्ये सातत्याने पावसाचा जोर कायम राहिला आहे. सातत्याने पडणार्या पावसामुळे भातशेतीला दिलासा मिळाला आहे. मात्र, तालुक्यातून वाहणार्या अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना इशारा पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर राहिल्यास अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने राजापूर बाजारपेठेतील व्यापारी अधिक सतर्क झाले आहेत. भातशेतीच्या लावणीच्या ऐन हंगामामध्ये पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या भातशेतीला त्याचा फटका बसला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List