सावरकर सदनाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा केव्हा मिळणार, हायकोर्टाची सरकारला विचारणा

सावरकर सदनाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा केव्हा मिळणार, हायकोर्टाची सरकारला विचारणा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादर येथील ऐतिहासिक सावरकर सदनाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. यावरून हायकोर्टाने सरकारला फटकारले. सदनाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा केव्हा मिळणार, असा सवाल करत खंडपीठाने सरकारला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

वारसा स्थळ आणि राष्ट्रीय स्मारकांच्या यादीत सावरकर सदनाचा समावेश महापालिकेने 2012 साली केला असून अंतिम शिफारशीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. असे असतानाही इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याने वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यापूर्वी इमारत पाडली जाईल, असा दावा करत अभिनव भारत काँग्रेस या संघटनेचे अध्यक्ष पंकज फडणीस यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

राहुल गांधींना आम्ही सावरकर वाचायला सांगू शकत नाही

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचा द्वेष दूर करण्यासाठी राहुल गांधी यांनी आमची याचिका वाचावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी निकाली काढली. राहुल गांधी यांना आम्ही सावरकर वाचायला सांगू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. डॉ. पंकज फडणीस यांनी ही जनहित याचिका केली होती. मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

किवी खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर… जाणून घ्या आरोग्यदायी फायदे किवी खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर… जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
बद्धकोष्ठता ही एक मोठी समस्या आहे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते त्यांचे आयुष्य अपूर्ण राहते. प्रत्येक क्षणी मनात अस्वस्थता असते....
करीना कपूर नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय असं खास खाते? न्यूट्रिशनिस्ट केला तिच्या फिटनेसचा खुलासा
माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाईंड बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा आरोप
IND Vs ENG 3rd Test – …तर सामना जिंकलो असतो, टीम इंडियाच्या पराभवानंतर सौरव गांगुली फलंदाजांवर नाराज
HDFC बँक बोनस शेअर; 19 जुलैला महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता, गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट
शाळेच्या फी वाढीविरोधात तक्रारीसाठी 25 टक्के पालकांनी एकत्र येण्याची अट शिथिल करा, वरुण सरदेसाई यांची मागणी
Health Tips – निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी किमान एक वाटी ‘हे’ खायलाच हवे, वाचा