स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीला लागा, राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इगतपुरीतील शिबिरात पदाधिकाऱ्यांना दिल्या. इगतपुरी येथील हॉटेल कॅमल व्हॅलीमध्ये सोमवारपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन दिवसीय शिबीर सुरू आहे. अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह नेते व पदाधिकारी येथे दाखल झालेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला लागा. मतदार याद्यांवर बारकाईने काम करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. दुपारी तीनच्या सुमारास राज ठाकरे, अमित ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह पदाधिकारी इगतपुरीतच आहेत. उद्या बुधवारी शिबिराचा समारोप होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List