जागतिक सर्पदिनानिमित्त सापांच्या विविध प्रजातींचे संरक्षण, संर्वधन करा; सर्पदंशाबाबत जनजागृतही महत्त्वाची
जागतिक सर्प दिन दरवर्षी 16 जुलै रोजी असतो. जगभरातील सापांच्या विविध प्रजातींबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि सापांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच सर्पदंश त्याचे परिणाम आणि त्यापासून बचावाबाबतही जनजागृती करण्यात येते.
जागतिक सर्प दिन हा साप आणि समाज यांच्यातील संबंधांबाबत जनजागृती करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. सापासारखे सरपटणारे प्राणी पर्यावरणीय संतुलनासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. मात्र, सर्पदंशामुळे होणारी विषबाधा ही एक गंभीर समस्या आहे. दुर्गम ग्रामीण भागात आणि आरोग्याच्या सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी ही गंभीर समस्या आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार म्हणून संर्पदशाला वर्गीकृत केले आहे. सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो व्यक्तींचा मृत्यू होतो आणि अनेकांना दीर्घकालीन अपंगत्वही येते. याचा मोठा फटका शेतमजूर आणि दुर्गम, मुले आणि दुर्गम गावांवर होतो. केवळ उपचारांमध्येच नव्हे तर, जागरूकता, प्रतिबंध आणि आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्याच्या व्यापक वचनबद्धता यामुळे या समस्येवर मात करता येते. सर्पदंशांच्या विषावरील संशोधन, निदान आणि विषविरोधी विकासातील वैज्ञानिक प्रगती प्रत्यक्ष परिणामांमध्ये सातत्याने सुधारणा दर्शवित आहे. त्याचबरोबर नावीन्यपूर्णता प्रत्यक्षात सुलभतेत दिसण्यासाठी सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधक आणि उद्योग यांच्यातील एकत्रित सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे.
विज्ञान आणि आरोग्यसेवेतील सामूहिक कृतीतून सर्पदंशापासून बचावासाठी उपयुक्त आहे. साप आणि समाज यांच्या नात्याचे स्मरण जागतिक सर्प दिनानिमित्त केले जाते. त्यामुळे स्वतःचा बचाव करत वन्य जीवांचे संवर्धन आणि करु या, असे आवाहन या दिनानिमित्त करण्यात येत आहे.
– सिद्धार्थ डागा, व्यवस्थापकीय संचालक, व्हिन्स बायोप्रॉडक्टस् लिमिटेड (VINS Bioproducts Ltd.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List