धार्मिक विधी करताना अपार्टमेंटमध्ये आग, हिंदुस्थानी महिलेचा युएईमध्ये मृत्यू
घरी धार्मिक विधी करताना अपार्टमेंटला आग लागल्याने हिंदुस्थानी महिलेचा युएईत दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे ही घटना घडली. मयत महिलेची ओळख अद्याप पटली नाही.
अल मजाज परिसरातील 11 मजली इमारतीतील राहत्या अपार्टमेंटमध्ये ही 46 वर्षीय महिला विशेष धार्मिक विधी करत असताना आग लागली. आगीत महिलेचा फ्लॅटचे मोठे नुकसान झाले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आपत्कालीन कॉल आल्यानंतर नागरी संरक्षण पथके आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List