‘पंचायत’ फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, मनोरंजन विश्वात खळबळ

‘पंचायत’ फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, मनोरंजन विश्वात खळबळ

प्राइम व्हिडिओची फेमस वेब सिरीज ‘पंचायत’ फेम अभिनेता आसिफ खानला सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. सध्या अभिनेत्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसिफ खानने पंचायत सिरीजमध्ये जावयाची भूमिका निभावली आहे. आसिफ खानने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती दिली.

आसिफने इंस्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. फोटो सीलिंगचा आहे. फोटो शेअर करत पुढे लिहिले की, “36 तास हे पाहिल्यानंतर मला जाणवले की आयुष्य खूप छोटं आहे. एकही दिवस गृहीत धरू नका. एका क्षणात सर्व काही बदलू शकते. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा. तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे हे जाणून घ्या आणि ते लक्षात ठेवा. जीवन ही अनमोल भेट आहे आणि आपण धन्य आहोत.”

यानंतर त्याने दुसरी पोस्ट केली आहे. यात त्याने ज्या दिवशी तो रुग्णालयात दाखल झाला त्या दिवसाबाबत सांगितले. तो म्हणाला, मला काही तासांपासून त्रास होत होता. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच आपल्याप्रती व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई शंभुराज देसाईंना भिडले, विधानसभेत खडाजंगी आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई शंभुराज देसाईंना भिडले, विधानसभेत खडाजंगी
वांद्रे येथील संरक्षण विभागाच्या जमिनीबाबत पाठपुराव्यावरून मंत्र्यांनी विधानसभेची दिशाभूल करणारी माहिती देण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनेचे सदस्य कमालीचे आक्रमक झाले. शिवसेना...
मोहीम फत्ते… शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले!
जातोय, पण सोडत नाहीय! जयंत पाटील झाले भावुक
मोदी आणि भागवतांवर अर्बन नक्षल म्हणून गुन्हे दाखल करणार का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे; पुण्यात गुंडांचा धुडगू, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या लेकीवर हात टाकला; धक्काबुक्की, शिवीगाळ आणि बेदम मारहाण
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे
कोकणात पावसाचे धुमशान; रायगडात रेड तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट; अनेक गावांचा संपर्क तुटला