मँचेस्टर कसोटीसाठी बशीरऐवजी डॉसन
लॉर्ड्सचे मैदान गाजवल्यानंतर इंग्लंड संघाने हिंदुस्थानविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील मँचेस्टर येथील ओल्ड ट्रफर्डवर 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे.त्यामुळे लॉर्ड्सवर तिसऱया कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेला फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या जागी डावखुरा गोलंदाज लियाम डॉसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ ः बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ऑली पोप, ज्यो रूट, जॅमी स्मिथ, जॉश टंग, ख्रिस वोक्स.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List