नालासोपाऱ्यात भरचौकात राडा, बापलेकाने ट्रॅफिक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी तुडवल
नालासोपारामध्ये ट्रॅफिक पोलिसांना भरचौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुर्वेकडील प्रगती नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाप-लेकाने ट्रॅफिक पोलिसांना रस्त्यावर आडवं करून लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे.
नालासोपाराच्या प्रगती नगरात दोन वाहतूक पोलिसांना बापलेकाने जबर मारहाण केली. भरचौकात सिग्नलजवळ या दोघांनी ट्रॅफिक पोलिसांना मारहाण केली. बापाने ट्रॅफिक पोलिसाला पकडून रस्त्यावर पाडून मारहाण केली. त्यानंतर मुलाने ट्रॅफिक पोलिसाला लाथांनी मारहाण केली. ही घटना घडत असताना घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दुसऱ्या पोलिसाने या तरुणाला अडववले. तरी देखील बापलेकाने ट्रॅफिक पोलिसांना बेदम मारहाण केली. हनुमंत सांगळे आणि शेष नारायण अत्रे असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसांचे नाव आहे. तर मंगेश नारकर आणि त्यांचा मुलगा पार्थ नारकर अशी मारहाण करणाऱ्या बापलेकांची नावे आहेत.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाप लेकावर नालासोपाराच्या तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वसई-विरार शहरात वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांवर मारहाण करण्याचे प्रकार शहरात वाढू लागले आहेत. पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List