महामार्गाला एक टक्काही शेतकऱ्यांचे समर्थन नाही, फडणवीसांचा ढोंगीपणा राजू शेट्टींकडून उघड

महामार्गाला एक टक्काही शेतकऱ्यांचे समर्थन नाही, फडणवीसांचा ढोंगीपणा राजू शेट्टींकडून उघड

कोल्हापूर जिह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गास संमती दिल्याचा कांगावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामध्ये त्यांचा ढोंगीपणा समोर आल्याचा खळबळजनक आरोप शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ झालेल्या बैठकीत जिह्यातील केवळ 35 शेतकऱ्यांनीच सातबारा दिले असल्याने एक टक्काही लोकांचे शक्तिपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.

दोन दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत 35 लोकांनी सातबारा शासनाकडे जमीन संपादनास दिल्याचे सांगण्यात आले आहे. कोल्हापूर जिह्यात एकूण 3 हजार 822 गटधारकांची जवळपास 5 हजार 300 एकर जमीन संपादित केली जाणार असून या गटामध्ये 10 हजारहून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत. यामुळे गटधारकांच्या एक टक्काही लोकांचे या महामार्गास संमती नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य सरकार शक्तिपीठ महामार्ग समर्थनासाठी जो खटाटोप करत आहे, त्यात ते सपशेल अपयशी ठरले आहे. कोल्हापूरच्या जनतेला पुराच्या खाईत लोटणाऱ्या शक्तिपीठ महामार्गरूपी राक्षसापासून रक्षण आई अंबाबाईच करेल, असा ठाम विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

…त्यावर मुख्यमंत्री ‘ब्र’ काढत नाहीत

कोल्हापूर जिह्यात शक्तिपीठ महामार्गामुळे महापूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन विभागातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये होणारी पर्यावरणाची हानी, क्षारपड जमिनींची समस्या, शहरी व ग्रामीण भागातील वाढीव पूरबाधित भागातील गोरगरीब लोकांचे होणारे नुकसान, महामार्गाच्या दोन्ही बाजूस संरक्षित भिंत असल्याने गावाचे, शेतीचे व वाडी-वस्तीचे होणारे विभाजन, ऊस उत्पादनात घट झाल्याने भविष्यात साखर कारखानदारी व ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याबाबत मुख्यमंत्री ‘ब्र’ काढायला तयार नसल्याचा टोलाही राजू शेट्टी यांनी हाणला.

बोगस शेतकरी दाखवून वरकमाईसाठी खटाटोप

काँगेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गेल्या अधिवेशनात समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागितली. गेल्या आठवड्यात याबाबत लेखी पत्रसुद्धा दिले. मग ही माहिती त्यांना आज अखेर का देण्यात आली नाही? असा सवाल करत, जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात राज्य सरकारचा कोणताही निर्णय स्पष्ट झालेला नाही. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कोणतीही गोष्ट रेटून व लादून करण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून 86 लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली, तेच क्षीरसागर आता शक्तिपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून 50 हजार कोटींच्या वरकमाई घेण्यासाठी खटाटोप करत असल्याचा गंभीर आरोपही राजू शेट्टी यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;