दुचाकींनाही टोल, मोदी सरकारचा छुपा अजेंडा उघड

दुचाकींनाही टोल, मोदी सरकारचा छुपा अजेंडा उघड

दुचाकींना टोल लागणार असल्याचे वृत्त गेल्या महिन्यात आले. परंतु, देशभरातून याला होत असलेला विरोध पाहता मोदी सरकारने घुमजाव केले आणि दुचाकींकडून टोल वसूल करणार नसल्याचे खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. याला महिनाही पूर्ण झाला नसताना मोदी सरकारचा दुचाकाRकडून टोल वसुलीचा प्लानच समोर आला आहे. गोरखपूर लिंक एक्स्प्रेस-वेवर दुचाकीचालकांकडून टोल वसुली लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीच तेथील व्यवस्थापकांनी सरकारी आदेशाच्या हवाल्याने दिली. हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने मोदी सरकारच्या छुप्या अजेंडय़ाची आज पोलखोल केली.

सरकारची लपवाछपवी

  • मोदी सरकार दुचाकीवर टोल लावणार अशा बातम्या 26 जून रोजी झळकल्या.
  • या बातमीचे तीव्र पडसाद उमटले. लोकांनी अशा टोलला कडाडून विरोध केला.
  • मोदी सरकारने लगेच यू टर्न घेतला आणि दुचाकीवर टोल हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.
  • सरकारच्या स्पष्टीकरणाने लोकांचा विरोध मावळला. मात्र आता महिनाभरानंतर उत्तर प्रदेशातील टोलनाक्यावरील व्यवस्थापकानेच भाजप सरकारचा छुपा अजेंडा समोर आणला.

जनतेकडून वसुली करून श्रीमंत मित्रांचे खिसे भरणे हाच भाजपाचा फंडा

गरीब जनतेकडून टोल तसेच इतर योजनांच्या माध्यमांतून वसुली करायची आणि आपल्या श्रीमंत मित्रांचे खिसे भरायचे हाच भाजपाचा फंडा आहे, अशी टीका काँग्रेसने केली. दुचाकीवाल्यांनो सतर्क राहा, पुढे टोल नाका आहे, अशा शब्दांत भविष्यातील लुटीची कल्पनाही काँग्रेसने दिली आहे. यावर हा प्रकल्प आमच्या अखत्यारित येत नाही, असे अजब स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले.

140 रुपये टोल

व्यवस्थापकाने दुचाकीकडून वसूल केल्या जाणाऱया टोलची रक्कमसुद्धा जाहीर केली. दुचाकीस्वाराला 140 रुपयांचा टोल द्यावा लागेल. एक्सप्रेस वेचे अंतर जास्त असेल तर रक्कम वाढेल, असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;