शिवसेनेवर अन्याय झाला, SC मध्ये न्याय व सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो! – संजय राऊत

शिवसेनेवर अन्याय झाला, SC मध्ये न्याय व सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो! – संजय राऊत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी होणार आहे. याबाबत आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयात आम्ही न्याय आणि सत्याचा विजय होईल, अशी अपेक्षा करतो, असे राऊत म्हणाले.

पत्रकार परिषदे दरम्यान माध्यमांनी संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत विचारले. याला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेनेवर अन्याय झाला आणि तो अन्याय कुणी केला? गृहमंत्री अमित शहा, देशाचे निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष. त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयातच जावे लागले. मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या. पण तेही न्याय देऊ शकले नाहीत.

गद्दार मिंधे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणाचा वापर करण्यापासून रोखा, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाला केली आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आला. कुणी दिला तर निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाने आधार काय घेतला? तर पक्ष आधार घेतला नाही तर विधिमंडळातील बहुमत आधार घेतला.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी

विधिमंडळातील त्यातले काही आमदार पराभूत झाले. लोकसभेतील त्यांचे खासदार पराभूत झाले. ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिले, त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले. मग तो आधार कुठे आहे? त्याच्यामुळे नव्याने सुनावणी होऊन पक्षाने चिन्ह गोठवण्याची मागणी केली. कारण त्याच्यावर त्यांचा काहीच अधिकार नाही. आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो, असे राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;