साईभक्तांची लुटमार रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूजा साहित्याचे दर निश्चित

साईभक्तांची लुटमार रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूजा साहित्याचे दर निश्चित

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱया लाखो भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी आता शिर्डीचे प्रशासन एकवटले आहे. दुकानदारांकडून प्रसाद, मूर्ती आणि इतर वस्तू अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जात असल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिर्डी नगरपरिषद, साई संस्थान आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे कठोर पावले उचलली आहेत. याअंतर्गत शहरातील सर्व वस्तूंसाठी संदर्भदर निश्चित करण्यात आले असून, त्याचे पालन सर्व व्यावसायिकांसाठी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली.

या निर्णयामुळे एका बाजूला भक्तांची फसवणूक थांबेल, तर दुसऱया बाजूला प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. नगरपरिषदेने ठराव करून व या व्यवसायातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन या दरपत्रकास कायदेशीर मान्यता दिली आहे. या नव्या नियमांनुसार, प्रत्येक दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांना प्रशासनाने ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 15 जुलै 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;