ठाण्यात रिक्षाचालकाने तरुणीवर हात उगारला
रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस ठाणे शहरातही वाढत आहे. स्टेशनहून तीन हात नाका येथे रिक्षेतून कामावर जाणाऱ्या तरुणीला मध्येच उतरवण्याचा चालकाने प्रयत्न केला. तसेच तिच्यावर हातही उगारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रुचिरा चव्हाण असे या तरुणीचे नाव आहे.
कल्याणमध्ये राहणारी रुचिरा ठाण्यातील तीन हात नाका या परिसरात खासगी नोकरी करते. तिने ठाण्यातील सॅटिसखाली असलेल्या स्टॅण्डवरून तीन हात नाका येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा पुढे जाताच जवळचे भाडे नको असे म्हणत चालकाने तिला उतरण्यास सांगितले. यावेळी बाचाबाचीदेखील झाली. मुजोर रिक्षाचालकाने रुचिरा हिला मारहाणही करण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतः याबाबतचा व्हिडीओ काढला. चालकाची बळजबरी झुगारून ही तरुणी कशीबशी तीन हात नाक्यापर्यंत पोहोचली.
मराठीचा अवमान करणाऱ्या विरारच्या मुजोर रिक्षाचालकाला बेदम चोपले, शिवसैनिकांनी धडा शिकवला
फक्त चलन फाडण्याची कारवाई
तीन हात नाका येथील उड्डाणपुलाखाली रिक्षा थांबताच तरुणीने तेथे असलेल्या वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी फक्त चलन फाडण्याशिवाय कोणतीही कारवाई केली नाही. तुम्ही पोलीस ठाण्यात जा, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी तरुणीला दिला. रुचिरा हिच्याशी हुज्जत घालत तिच्यावर हात उगारणाऱ्या मुजोर चालकाला वाहतूक पोलिसांनी धडा शिकवणे गरजेचे असताना फक्त जुजबी कारवाई केल्याने संताप व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List