ते सूत्र नव्हे मूत्र! तेजस्वी यादव भडकले; बिहारमध्ये नेपाळी, बांगलादेशी मतदारांच्या बातम्या निवडणूक आयोगाकडून प्लांट
बिहारमधील मतदारयादी फेरतपासणीवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज घातलेल्या पत्रकार परिषदेत याची चुणूक दिसली. बिहारच्या मतदारयादीत नेपाळी, बांगलादेशींचा समावेश असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिल्याचे तेजस्वी यांना सांगताच ते भडकले. ‘ते सूत्र नव्हे मूत्र आहेत,’ असे त्यांनी सुनावले.
बिहारमधील मतदारयादी फेरतपासणीला आरजेडीसह अनेक विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने फेरतपासणीला स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी पुरावा म्हणून आधार, रेशनकार्ड व मतदार कार्ड ग्राह्य धरण्यास सांगितले आहे.
याच सूत्रांनी इस्लामाबाद, कराचीवर कब्जा केला होता!
निवडणूक आयोगाने या संदर्भात काही पत्रक काढले आहे का, ही बातमी कुठून आली, असा उलट प्रश्न तेजस्वी यांनी केला. ही सूत्रांची माहिती आहे, असे पत्रकारांनी सांगताच ते भडकले. ‘सूत्र सांगतायत? आम्ही त्या सूत्रांना मूत्र समजतो. हे सूत्र म्हणजे दुर्गंधी पसरवणारा मैला आहे. हे तेच सूत्र आहेत, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानवर कब्जा केला होता. इस्लामाबाद, कराची ताब्यात घेतले होते, असा सणसणीत टोला तेजस्वी यांनी हाणला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List