Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत ट्रेन
मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन नव्हे तर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन ही बिहारमधून धावणार आहे.
मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन आता बिहार ते दिल्ली दरम्यान धावणार आहे. मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन ऐवजी देशी बनावटीची हाय स्पीड ट्रेन वंदे भारत धावणार आहे. ही वंदे भारत ट्रेन देशातली पहिली ट्रेन असणार आहे जी 250 किमी ताशी वेगाने धावणार आहे.
दिल्ली ते हावडा व्हाया बिहार दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी 9 स्टेशन्स बनवले जाणार आहेत. दिल्लीपासून निघालेली ही ट्रेन आग्रा कँट, कानपूर सेंट्रल, अयोध्या, लखनौ, वाराणसी नंतर थेट पाटण्याला थांबणार आहे. त्यानंतर आसनसोल आणि शेवटचे स्टेशन हावडा असणार आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली हावडा बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सुपुर्द करण्यात आला आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प तयार केला जाईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली ते वाराणसी दरम्यान काम होईल. तर दुसऱ्या टप्प्यात वाराणसी ते हावडापर्यंत काम केले जाईल. या प्रकल्पासाठी पाच लाख कोटी रुपये खर्च होणार आहे.
दुसरीकडे मुंबई अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड कॉरिडॉरसाठी सूरत बलिमोरा दरम्यान 50 किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. वर्षअखेर या मार्गावर वंदे भारत ट्रेनची चाचणीही सुरू होईल, या मार्गावर आठ कोचच्या वंदे भारत धावतील. या ट्रेनचा वेग साधारणतः 280 किमी प्रति ताशी असली तरी ही ट्रेन 250 किमी प्रति ताशी वेगाने धावणार आहे.
तिप्पट किंमत वाढली
मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जपानने प्रत्येक कोचसाठी 16 कोटी रुपये लागतील असे सांगितले होते. पण गेल्या वर्षी जपानने या कोचची किंमत तिप्पट वाढवली आहे. जपानने आता प्रत्येक कोचची किंमत 50 कोटी केली असून या बुलेट ट्रेनची किंमत 800 कोटी रुपये झाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List