Home Remedies – रात्री अपरात्री दुखणाऱ्या दाढेत फक्त एक चिमूट ‘ही’ पावडर ठेवा, दाढदुखी होईल चुटकीसरशी कमी

Home Remedies – रात्री अपरात्री दुखणाऱ्या दाढेत फक्त एक चिमूट ‘ही’ पावडर ठेवा, दाढदुखी होईल चुटकीसरशी कमी

आपल्या आहारातील गरम मसाले केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. आपल्या वापरातील प्रत्येक गरम मसाल्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होत असतो. असाच एक गरम मसाला म्हणजे काळी मिरी. काळ्या मिरीला मसाल्यांची राणी असेही संबोधले जाते. पुराणकाळापासून काळी मिरी ही असंख्य रोगांवर रामबाण इलाज मानली जाते. काळी मिरीमध्ये असणारे गुणधर्म कर्करोग रोखण्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते. काळ्या मिरी मध्ये कॅल्शियम, आयरन, फाॅस्फोरस, थाईमिन सारखे पोषक तत्व आढळतात. शरीरावर येणारी सूज यावर काळी मिरी ही अतिशय गुणकारी मानली जाते. तसेच हृदय रोगावरही काळी मिरीचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

काळी मिरीचा वापर तुम्ही स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या व्यजंनामध्ये करु शकतात. आता आपण बघूया काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे.

 

Home Remedies – पावसाळ्यात वरचेवर होणाऱ्या पित्ताच्या त्रासावर हे आहेत हमखास घरगुती उपाय, वाचा

डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा काळी मिरी ही उत्तम मानली जाते.

भूक कमी लागणे, अपचन तसेच श्वसनाच्या समस्यांवरही काळी मिरी ही लाभदायक मानली जाते.

काळी मिरी ही पचनासाठी अतिशय उत्तम मानली जाते. त्यामुळे काळ्या मिरीचे सेवन केल्यामुळे, आपल्याला अन्न पचनास मोठ्या प्रमाणात मदत होते.

 

काळी मिरी आहारात समाविष्ट केल्यामुळे, चयापचय वाढते. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास खूप मदत होते.

रात्री अपरात्रीच्या दाढदुखी आणि दातदुखीवर काळी मिरी पावडर अतिशय गुणकारी मानली जाते. काळी मिरी पावडर आपल्या दातांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.

मलेरिया झाल्यावर काळी मिरी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण मलेरियाच्या विषाणूंना रोखण्यासाठी काळी मिरी ही खूप गुणकारी मानली जाते.

काळी मिरीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए मुळे काळी मिरी ही कर्करोगापासून बचाव करण्यासाठी समृद्ध मानली जाते.

(वरील कोणतेही उपाय करताना आपण योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल
चहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञ देखील कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल सांगत असतात....
तुम्ही पण बाळाच्या पायात काळा धागा बांधता? थांबा चूक करताय, बाळाला होऊ शकतो हा धोका
शेअर बाजारातील घसरण थांबणार कधी? अनिश्चततेने गुंतवणूकदार धास्तावले
Skin Care – ‘या’ डाळीच्या वापराने चेहऱ्यावरील मुरूम होतील चटकन दूर, वाचा
‘लाडकी बहीण’साठी आता हॉटेल मालकांच्या पैशांवर डल्ला; ठाणे हॉटेल असोसिएशनकडून हॉटेल बंद
Health Tips – साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा
समृद्धी टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड; अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसांच्या मुलाला लुटले, 82 हजारांची रोकड लांबवली