साखरपुड्याहून परतत असताना वाटेतच काळाचा घाला, मिनी बसची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

साखरपुड्याहून परतत असताना वाटेतच काळाचा घाला, मिनी बसची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

साखरपुडा समारंभ आटोपून घरी परतत असताना मिनी बसने ट्रकला धडक दिल्याने रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

राजस्थानमधील कोटा येथील दिल्ली-मुंबई महामार्गावर रविवारी पहाटे 3.30 वाजता हा अपघात घडला. करौली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 14-15 सदस्य मिनीबसने साखरपुडा समांरंभाहून घरी परतत होते. दिल्ली-मुंबई महामार्गावर बोरखेडाजवळ चालकाला डुलकी आल्याने बस अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. यात चौघांचा मृत्यू झाला. गीता सोनी, बृजेश सोनी, अनिल सोनी आणि सुरेश सोनी अशी मयतांची नावे आहेत. सर्वजण अनिल सोनी यांच्या मुलाच्या साखरपुड्याहून परतत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;