इराणमधून 16 दिवसांत 5 लाख अफगाणींची हकालपट्टी
इराणने अफगाणी नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी कारवाई आणखी तीव्र केली आहे. अवघ्या 16 दिवसांत इराण सरकारने तब्बल 5 लाख अफगाणी नागरिकांना देशाबाहेर काढल्याचे समोर आले आहे. ही कारवाई 24 जून ते 9 जुलैदरम्यान करण्यात आली. म्हणजेच रोज 30 हजारांहून अधिक अफगाणी नागरिकांना देशाच्या बाहेर काढण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांनी नागरिकांना जबरदस्तीने देशाबाहेर काढण्याची इराणची या दशकातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले आहे. इराणने इस्रायलसोबतच्या तणावपूर्ण संघर्षानंतर देशांतर्गत सुरक्षेचा हवाला देत बेकायदेशीररीत्या देशात राहणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईचे हत्यार उपसले आहे. अवैधरीत्या देशात राहणाऱ्या अफगाण नागरिकांनी 6 जुलैपर्यंत देश सोडावा, अन्यथा त्यांना जबरदस्तीने देशाबाहेर काढण्याचा इशारा इराण सरकारने मार्च 2025 रोजी केला होता. जूनमध्ये इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आणखी चिघळल्यानंतर इराण सरकारने अवैध नागरिकांविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List