शिकाऱ्याच्या हाती वाळवंटात खजिना लागला; न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव, खास दगडाला 34 कोटी किंमत मिळण्याची शक्यता
उल्कापिंड शोधणाऱ्या शिकाऱ्याला 2023 मध्ये सहारा वाळवंटात एक दगड सापडला होता. सुरुवातीला साधा वाटणारा हा दगड आता अत्यंत मौल्यवान असल्याचे उघड झाले आहे. याच दगडाचा आता अमेरिकेतली न्यूयॉर्क येथे लिलाव केला जाणार आहे. या शतकातील हा सर्वात अनोखा लिलाव आहे. जगप्रसिद्ध कंपनी सोथेबीजने या लिलावाचे आयोजन केले असून येथे या दगडाला 34 कोटींहून अधिक रक्कम मिळण्याचा अंदाज आहे.
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एका दगडासाठी कोट्यवधींची बोली कोण लावणार? पण कारण हा साधासुधा दगड नसून मंगळ ग्रहावरून थेट पृथ्वीवर कोसळलेल्या उल्कापिंडाचा सर्वात मोठा तुकडा आहे. NWA 16788 नाव असलेल्या या उल्कापिंडाचे वजन 54 पौंड अर्थात 24.5 किलो असून त्याची रुंदी 15 इँच आहे. आतापर्यंत सापडलेल्या मंगळाच्या इतर कोणत्याही तुकड्यापेक्षा हा सर्वात मोठा तुकडा आहे.
सोथेबीज कंपनीने हा दगड पृथ्वीवर कसा आला याचीही माहिती दिली आहे. मंगळ ग्रहावरील एक मोठी उल्कापिंड पृथ्वीवर आदळली. याचा एक तुकडा तुटून सहारा वाळवंटात पडला. हा दगड सुमारे 2.25 कोटी किलोमीटर प्रवास करून पृथ्वीवर आला असून 2023 मध्ये उल्कापिंड शोधणाऱ्या एका शिकाऱ्याला तो नायझरच्या वाळवंटात सापडला.
मंगळावरील उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ आहेत. पृख्वीर आतापर्यंत 77 हजारांहून अधिक उल्कापिंड सापडले आहेत. त्यापैकी फक्त 400 म्हणजेच सापडलेल्या उल्कापिंडापैकी 0.6 टक्के उल्कापिंड मंगळावरील आहेत. NWA 16788 हे या 400 उल्कापिंडांपैकी 6.5 टक्के, म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आहे, असेही सोथेबीज कंपनीने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List