धावत्या ट्रकमधून पडलेल्या लोखंडी पाइपांनी कारसह दुचाकीला चिरडले, दोन ठार; पाच गंभीर, बोरघाटात भयंकर घटना

धावत्या ट्रकमधून पडलेल्या लोखंडी पाइपांनी कारसह दुचाकीला चिरडले, दोन ठार; पाच गंभीर, बोरघाटात भयंकर घटना

धावत्या ट्रकमधून पडलेल्या लोखंडी पाइपांनी कारसह दुचाकीला चिरडल्याची भयंकर घटना शनिवारी रात्री उशीरा बोरघाटात घडली. या अपनातात दोन जण ठार झाले असून पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारला. यावेळी झटका लागल्याने ट्रकमधील भलेमोठे पाइप मागून येणाऱ्या वाहनांवर कोसळले. या घटनेमुळे जुन्या महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती.

ट्रकचालक लोखंडी पाइप घेऊन मुंबई येथून पुण्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान जुन्या महामार्गावरील बोरघाटात अंडापॉईंट येथील एचओसी ब्रिजवर आला असता ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारला. यावेळी ट्रकमधील लोखंडी पाईप मागून येत असलेल्या कार आणि दुचाकीवर कोसळल्या.

या अपघातात दुचाकीस्वार रुतिक चव्हाण (20) आणि कारमधील अंकिता शिंदे (28) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार वैभव गलांडे (28) व कारमधील सोनाली खाडदाते (33), शिवराज खाडदाते (33), लता शिंदे (50), ललित शिंदे (30) हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारमधील सर्वजण पुण्यातील भोसरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

बचाव दलांनी जखमींना बाहेर काढले

महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, हेल्प फाऊंडेशनचे पथक, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, मृत्युंजय देवदूत पथक यांनी घटनास्थळी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून कारमध्ये अडकलेल्या जखमींना सुखरूप बाहेर काढले.

नेरळजवळ खड्ड्यात कार आडवी; चार जखमी

नेरळ येथील पेशवाई मार्गावर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात आडवी होऊन चारजण जखमी झाल्याची घटना आज घडली. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. नेरळमध्ये राहणारे प्रल्हाद उर्फ गुरू पाटील हे रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कारने पत्नी व दोन मुलांसोबत निघाले होते. दरम्यान कर्जत कल्याण राज्य मार्गाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोला साईड देत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट खोल खड्यात कलंडली. रस्त्याच्या कडेला सायडिंगपट्टी किंवा सुरक्षा रेलिंग नसल्याने हा अपघात झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल
भारतीय स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला जिरा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्याचा उपयोग हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही...
Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत ट्रेन
मला हा खटला निकालात काढायचा आहे! न्यायाधीशांनी केलं स्पष्ट, ऑगस्टमध्ये होणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी
पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली जबाबदारी
San Rechal – मिस वर्ल्ड ‘ब्लॅक ब्यूटी’ सॅन रेचेलनं उचललं टोकाचं पाऊल, आर्थिक तंगीमुळं जीवन संपवलं
पावसाळ्यात तोंडली खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला?