आरे कॉलनीत गुरुपौर्णिमा उत्साहात
गोरेगाव पूर्व येथे श्री क्षेत्र स्वामी समर्थ मठ आरे कॉलनी गट क्रमांक सहा येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठय़ा उत्सवात झाला. उत्सवात उपनगरातील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. श्री क्षेत्र स्वामी समर्थ मठ येथे सकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती पार पडली. आरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. संध्याकाळी परत दर्शन, गुरू दर्शन आणि महाआरती झाल्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केलेल्या साई तुफान भक्ती गीताने कार्यक्रमाची रंगत वाढली. या वेळी सुमारे चार ते पाच हजार भाविक उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र घाणेकर यांनी भाविकांचे स्वागत केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List