मुंबईत आणखी एक भूमिगत मेट्रो, आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान धावणार; सरकारला प्रस्ताव सादर

मुंबईत आणखी एक भूमिगत मेट्रो, आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान धावणार; सरकारला प्रस्ताव सादर

मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 चे संपूर्ण 33.5 किमी अंतर सुरू होण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. असे असतानाच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबईतील आणखी एका भूमिगत मेट्रोसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. MMRCL ने लाईन 11 साठीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.

हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. या मेट्रोची आखणी आणि बांधकामाची जबाबदारी MMRCL कडे आहे. या मार्गाची एकूण लांबी 17.5 किमी असून ती अणिक डेपोपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत असणार आहे. या मार्गात नागपाडा, भेंडी बाजार यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांमधून ही मेट्रो जाईल. अणिक डेपो हे एकमेव स्थानक जमिनीवर असेल तर उर्वरित सर्व स्थानकं भूमिगत असणार आहेत.

MMRCL च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावाची प्राथमिक मंजुरी राज्य सरकारकडून घेतली जाईल आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. यासाठी प्रथम सविस्तर अहवाल तयार केला जातो. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा अहवाल केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडे जाईल.

या प्रकल्पासाठी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधी मिळाल्यानंतर पर्यावरणासह इतर कायदेशीर परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर निविदा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या नियुक्त केल्या जाईल.

सुरुवातीला मेट्रोत सहा डबे असतील. अणिक आगार ते प्रतीक्षा नगर बेस्ट बस डेपो येथे 16 हेक्टर जागेत या मेट्रोसाठी डेपो उभारण्यात येईल. हा डेपो बेस्टच्या बस सेवेशी जोडला जाईल, जेणेकरून संयुक्त वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. लाईन 11 ही लाईन 4 (वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली), अ‍ॅक्वा लाईन, मोनोरेल आणि भायखळा व सीएसएमटीसारख्या उपनगरीय रेल्वे स्थानकांशी जोडली जाईल.

MMRCL च्या अंदाजानुसार, 2031 मध्ये या लाईनचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 5.8 लाख असेल आणि 2041 मध्ये ही संख्या 8.69 लाखांपर्यंत पोहोचेल. टेंडर प्रक्रिया, काम सुरू होण्याची व पूर्ण होण्याची तारीख ही राज्य व केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच निश्चित केली जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल
चहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञ देखील कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल सांगत असतात....
तुम्ही पण बाळाच्या पायात काळा धागा बांधता? थांबा चूक करताय, बाळाला होऊ शकतो हा धोका
शेअर बाजारातील घसरण थांबणार कधी? अनिश्चततेने गुंतवणूकदार धास्तावले
Skin Care – ‘या’ डाळीच्या वापराने चेहऱ्यावरील मुरूम होतील चटकन दूर, वाचा
‘लाडकी बहीण’साठी आता हॉटेल मालकांच्या पैशांवर डल्ला; ठाणे हॉटेल असोसिएशनकडून हॉटेल बंद
Health Tips – साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा
समृद्धी टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड; अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसांच्या मुलाला लुटले, 82 हजारांची रोकड लांबवली