London Plane Crash – लंडनमध्ये छोटे प्रवासी विमान कोसळले, उड्डाण घेताच भीषण आग

London Plane Crash – लंडनमध्ये छोटे प्रवासी विमान कोसळले, उड्डाण घेताच भीषण आग

उड्डाण घेताच एका छोट्या प्रवासी विमानाला आग लागून ते कोसळल्याची भीषण घटना लंडनमध्ये घडली. लंडनच्या साउथेंड विमानतळावर रविवारी दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात धुराचे लोळ उठले होते. विमानात किती लोकं होते याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्नीशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमान Beech B200 सुपर किंग एअर, एक ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप जेट होते आणि ते नेदरलँड्समधील लेलिस्टॅडला जात होते. मात्र उड्डाण घेताच विमानाला आग लागली आणि कोसळले. घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आल्या.

विमानतळाच्या प्रवक्त्याने घटनेची पुष्टी केली आहे. अपघातामुळे रविवारी दुपारी चार नियोजित उड्डाणे रद्द करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अद्याप विमानात किती लोक होते आणि त्यांची प्रकृती कशी आहे हे उघड केलेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नशेची झिंग आणणाऱ्या 52 इंजेक्शनसह तिघांना अटक, इचलकरंजीत पोलिसांची कारवाई नशेची झिंग आणणाऱ्या 52 इंजेक्शनसह तिघांना अटक, इचलकरंजीत पोलिसांची कारवाई
इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांनी मिशन झीरो ड्रग्जअंतर्गत मोठी कारवाई करून प्रतिबंधित 52 नशेच्या इंजेक्शन बॉटलचा साठा पकडून तिघांना अटक केली...
शनिभक्तांची फसवणूक करणाऱ्या पाच बनावट अ‍ॅपवर गुन्हा दाखल, देवस्थानकडून फिर्याद देण्यास विलंब; अखेर पोलिसांनी दिली फिर्याद
सांगोल्यात ‘शक्तिपीठ’ला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली
‘शक्तिपीठ’ला एक टक्काही शेतकऱ्यांचे समर्थन नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा ढोंगीपणा राजू शेट्टींकडून उघड
महाभयंकर विमान अपघातातून वाचला, पण रात्रीची झोप उडाली, बोलणेही बंद…
कुलरमधून घाण वास येतोय? मग ‘हे’ करून पहा
कर्नाटकच्या गुहेत सापडली रशियन महिला, 2017 ला संपलाय व्हिसा, दोन मुलींसह जंगलात वास्तव्य