ट्रेंड – कोटय़वधींच्या बचतीचा फंडा
आज अशा एका व्यक्तीबद्दल जाणून घेऊ या, जे वयाच्या 45 व्या वर्षी निवृत्त झाले आणि निवृत्तीच्या वेळी त्यांची बचत आहे 4.7 कोटी! महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तीने कुठलीही गलेलठ्ठ पगाराची नोकरी केली नाही, एखादा उद्योग उभा केला नाही किंवा त्याने शेअर बाजारात ट्रेडिंगदेखील केले नाही. मग त्याला हे कसं शक्य झालं? या व्यक्तीबद्दल त्याच्या पुतण्याने सबरेडीटवर पोस्ट लिहून माहिती दिली आहे. ही पोस्ट व्हायरल होतेय. पुतण्याने म्हटलेय काकांनी फक्त लहान पगाराची एक रटाळ नोकरी केली, पण फरक पडला तो शिस्तीमुळे. 1998 साली जेव्हा म्युच्युअल फंड हे लोकांना पुरेसे माहिती नव्हते, तेव्हा काकांनी बऱ्यापैकी मोठी असलेली 10 हजारांची रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. त्यांनी 500 रुपयांचा एसआयपी सुरू केला, 2010 पर्यंत ते 20 हजार रुपये दर महिन्याला टाकत होते. त्यांनी हे कधीच बंद केले नाही. अशा तऱहेने काकांनी नव्या पिढीला गुंतवणुकीचा फंडा सांगितला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List