विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा, अहिल्यानगरच्या दोन भक्तांकडून अर्पण

विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा, अहिल्यानगरच्या दोन भक्तांकडून अर्पण

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी भाविकांकडून मोठय़ा प्रमाणात दान दिले जाते. नुकतीच आषाढी एकादशी झाली असून या काळात मोठय़ा प्रमाणात विठुरायाच्या चरणी दान आले. अहिल्यानगर येथील दोन व्यापाऱ्यांनी मिळून तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांचा 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण केला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे दान करण्यात आले.

विठ्ठल मंदिरातील चौखंबी दरवाजा चांदीने मढवण्यात आला आहे. अहिल्यानगर येथील विठ्ठलभक्त अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी स्वखर्चातून देवाच्या चरणी हा चांदीचा दरवाजा अर्पण केला. अत्यंत सुरेख अशी कलाकुसर केलेला दरवाजा राजस्थानातील उदयपूर येथे तयार करण्यात आला आहे. यासाठी तीन महिने कालावधी लागला.

10 लाख भाविकांनी घेतले दर्शन

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 20 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे दहा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची मंदिर समितीकडे नोंद झाली.  4 लाख 54 हजार भाविकांनी  रांगेत उभे राहून देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले. तर 5 लाख 47 हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले. अजूनही हजारो भाविक दर्शन घेणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;