Photo – लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरसह दिग्गजांची मांदियाळी
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने टीम इंडिया आणि इंग्लंड या संघांमध्ये सुरू असलेल्या तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी पत्नी अंजली तेंडुलकरसोबत लॉर्ड्सवर हजेरी लावली होती. त्याचे काही फोटो सचिनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात सचिन तेंडुलकरच्या हस्ते घंटा वाजवून करण्यात आली.
या सामन्या दरम्यान क्रीडाविश्वातील तीन दिग्गज हस्ती म्हणजेच सचिन तेंडुलकर,बॅरी रिचर्ड आणि जेफ्री यांची ऐतिहासिक भेट झाली. हा दुर्मिळ क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये सुद्धा उत्सुकता पाहायला मिळाली.
तसेच ब्रायन लारा, ख्रिस गेल, रवी शास्त्री यांनी देखील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सवर हजेरी लावली होती.
त्याचबरोबर क्रीडाप्रेमी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे सुद्धा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सवर उपस्थित होते. यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत एकमेकांसोबत फोटो काढला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List