हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेत तातडीने सुधारणांची आवश्यकता, सरन्यायाधीश गवई यांचं वक्तव्य

हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेत तातडीने सुधारणांची आवश्यकता, सरन्यायाधीश गवई यांचं वक्तव्य

देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर गंभीर चिंता व्यक्त करत सुधारणांची तातडीची गरज असल्याचे म्हटले आहे. हैदराबादमधील नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ येथे आयोजित दीक्षांत समारंभात बोलताना त्यांनी देशाच्या कायदेशीर यंत्रणेला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य केलं आहे.

नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ येथे विदयार्थ्यांना संबोधित करताना सरन्यायाधीश गवई यांनी म्हणाले की, हिंदुस्थानी न्यायव्यवस्था अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. खटले कधीकधी दशकांपर्यंत लांबतात. आपण असे अनेक प्रकरण पाहिले आहेत जिथे एखाद्या व्यक्ती वर्षानुवर्षे तुरुंगात कैदी म्हणून घालवल्यानंतर निर्दोष आढळतो.

सरन्यायाधीश गवई म्हणाले की, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि यावर मात करण्यासाठी नव्या पिढीतील कायदेशीर प्रतिभांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी विद्यार्थ्यांना नैतिकता आणि प्रामाणिकपणाने काम करण्याचा सल्ला दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा...
बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
युरोपीय युनियन, मेक्सिकोवर टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, 1 ऑगस्टपासून होणार लागू
रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
कृषिभान- वाटचाल कुपोषणाकडून उपोषणाकडे!
माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान
विशेष – ‘उत्तराधिकारी’ निवडीचे भूराजकीय पडसाद!