जगद्गुरु तुकोबांच्या पालखीचे बेलवाडीत रंगले गोल रिंगण

जगद्गुरु तुकोबांच्या पालखीचे बेलवाडीत रंगले गोल रिंगण

>> नीलकंठ मोहिते

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे आज संपन्न झाले. मानाचे दोन अश्व गोल रिंगणात सोडून या अश्वांच्या तीन परिक्रमांनी वारकऱयांनी सांप्रदायिक खेळ खेळत पहिले गोल रिंगण उत्साहात पार पडले. यावेळी ‘ज्ञानेश्वर माउली…तुकाराम…’ असा एकच जयघोष झाला.

धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ।। धन्य जालो आतां यासि संदेह नाहीं । न पडे या वाहीं काळा हाती ।।

ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ।।

विठ्ठलनामाचा महिमा गात निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण टाळकरी, वीणेकरी, पताकावाले, पखवाजवाले व तुळशीवाल्या महिला आणि मानाचे अश्व यांनी सुरू असलेल्या हरिनामाच्या गजरात परिक्रमा पूर्ण करीत गोल रिंगणाने लाखो नयनांचे पारणे फेडले. ‘ज्ञानोबा… तुकाराम…’च्या गजराने बेलवाडी दुमदुमली.

सणसर गावच्या हद्दीतील मुक्काम आटोपून सकाळच्या प्रहरात पालखी बेलवाडीकडे मार्गस्थ झाली. बेलवाडीत पहिले गोंल रिंगण असल्याने इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यांतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तुकोबारायांचा पालखीरथ रिंगणस्थळी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी दाखल झाला. गावकऱयांनी पालखी खांद्यावर घेत रिंगणस्थळावरील शामियान्यात जयघोष करीत आणली.

यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि पालखी विश्वस्तांच्या हस्ते रिंगण सोहळ्यात मानाच्या अश्वांचे पूजन करण्यात आले. तहसीलदार जीवन बनसोडे, अर्जुन देसाई, मयूरी जामदार, शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.

पांडुरंगा काहि आईकावी मात!
न करावे मुक्त आता मज!
जन्मांतरे मज तैशी देई देवा!
जेणे चरण सेवा घडे तुझी!

असे म्हणत बेलवाडीकरांनी वारकऱयांचा पाहुणचार केला. अशीच सेवा जन्मोजन्मी मिळू दे, असे साकडे गावकरी घालत होते. दुपारच्या विश्रांतीसाठी गावकऱयांनी गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत पालखी गावातील मारुती मंदिरात आणली. यावेळी तोफांची सलामी देण्यात आली. दुपारची न्याहरी घेऊन पालखी सोहळा लासुर्णे जंक्शन, अंथुर्णेमार्गे निमगाव केतकीकडे मार्गस्थ झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;