पनीर टिक्का अन् बासमती राईस; लॉर्ड्सवर खेळाडूंची मेजवानी, Menu व्हायरल
टीम इंडिया आणि इंग्लंड या संघामध्ये तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. पहिला सामना इंग्लंडने आणि दुसरा सामना टीम इंडियाने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. लॉर्डसवर सुरू असलेल्या सामन्यात दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी दमदार खेळाच प्रदर्शन करत आहेत. खेळाडूंचा हाच उत्साह आणि ऊर्जा
कायम रहावा म्हणून त्यांच्या खाण्यापिण्य़ावरही विशेष लक्ष दिले जात आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूंसाठी ECB कडून खास मेजवानीचा बेत आखला होता. या मेजवानीचा मेनू आता सोशल मीडिया जोरदार व्हायरल झाला आहे. व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांची जत्राच खेळाडूंसाठी भरवली होती. यामध्ये चिकन मिटबॉल, पनीर टिक्का, क्रश पोटॅटो, ब्रोकोली, फ्रूट सलाड, बासमती राईस यांसारख्या पदार्थांचा समावेश होता.
On the lunch menu for the players on day two! pic.twitter.com/X12DDx12nG
— Lord’s Cricket Ground (@HomeOfCricket) July 11, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List