लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई
लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाच्या 100 मिटर परिसरातील पानटपऱ्या, किराणा दुकानांची 67 पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. ज्या पानटपऱ्या व किराणा दुकानामध्ये अवैध गुटखा तसेच तंबाखुजन्य पदार्थ सापडले. त्या पान टपऱ्या व किराणा दुकानावर भारतीय न्याय संहिता, (COTPA Act, 2003) म्हणजे ‘सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात बंदी आणि व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन) कायदा, 2003 कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी विशेष मोहीम राबवून संपूर्ण लातूर जिल्ह्यात 67 पथके तयार करून महाविद्यालय, शाळा परिसरामधील अचानक छापेमारी केली व त्यामध्ये भारतीय न्याय संहिता अन्वये 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून 07 गुन्ह्यामध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू असा एकूण 05,63,517 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 149 कार्यवाही करण्यात आल्या आहेत.
सदर कारवाई दरम्यान 218 शाळांना महाविद्यालयाला भेटी देऊन शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या 469 पानटपऱ्या, किराणा दुकान तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ विकणारे दुकानावर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कारवाई करिता 53 अधिकारी व 245 पोलीस अमलदार यांची नेमणूक करून 67 पथके तयार करण्यात आली होती. शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री करणे खपवून घेतले जाणार नाही त्यांच्याविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List