कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना दिला आहे.
अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी बारामती येथील सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी हुल्लडबाजी करणाऱयांना कठोर शब्दांत इशारा दिला. मोटरसायकलवाले इकडे तिकडे बघतात आणि हळूच ओव्हरटेक करून किंवा राँग साईडने दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. असे कुणी सापडले तर तो कितीही मोठय़ा बापाचा असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे. त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत, अजिबात कोणी नियम मोडू नका. मग तो अजित पवार असो किंवा अजित पवारचा कोणी नातेवाईक असो. सगळय़ांना इथे नियम सारखे आहेत,’ असे अजित पवार यांनी म्हटले. शहरातील मोकाट जनावरांवरूनही त्यांनी भाष्य केले. मी बारामती चांगली करतो, ती काय सर्वांना कसेही फिरण्यासाठी नाही,’ असेही त्यांनी ठणकावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List