पुण्यातील मोफत कायदेशीर सल्ला केंद्राला उत्तम प्रतिसाद; शिव विधी व न्याय सेनेचा उपक्रम
शिव विधी व न्याय सेनेतर्फे पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारपासून मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद मिळाला असून अनेक पीडित नागरिकांच्या समस्यांवर शिव विधी सेनेच्या वकिलांनी त्यांना योग्य ते कायदेशीर उपाय सुचवले.
शिव विधी व न्याय सेना, महाराष्ट्र राज्य ही शिवसेनेची अंगीकृत संघटना आहे. कायदेशीर सल्ला केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी शिव विधी व न्याय सेना, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष ऍड. नितीश सोनवणे, उपाध्यक्ष (प्रभारी) ऍड. स्वप्ना कोदे, चिटणीस ऍड. सुमीत घाग, समन्वयक ऍड. भूषण मेंगडे, पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग अध्यक्ष ऍड. कोजल कदम, चिटणीस विकास गोरडे, पुणे जिल्हाध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांच्यासह पुणे शहर अध्यक्ष गजानन थरकुटे, उपाध्यक्ष मनोज माने, प्रल्हाद कदम, माणिक रायकर, पोपट आजबे, दादाभाऊ शेटे, वासंती नलावडे, सारिका धरपाळे, रश्मी डोंगरे, प्रणव काळे, रितेश कदम, अजिता चौहान, तेजस काळे, चंद्रसेन कुमकर, कांताराम नप्ते, जयराम तांबे, राजेंद्र कुमकर, सचिन हिंगणेकर व अन्य पुणे जिह्याच्या वकील पदाधिकाऱयांसह शंभरहून अधिक नागरिक उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List