विश्वविक्रम मोडायला हवा होता, मुल्डरच्या निर्णयाबाबत लाराचे मत
विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. विआन मुल्डरनेही माझा विश्वविक्रम मोडण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता, असे मत व्यक्त केलेय विश्वविक्रमवीर ब्रायन लाराने. चार दिवसांपूर्वी मुल्डरने कसोटी क्रिकेटमधील लाराच्या सर्वोच्च 400 धावांच्या विश्वविक्रमासमीप असूनही 367 धावांवर त्याने संघाचा डाव घोषित करत तो विक्रम लाराच्या नावावरच कायम राखण्यात धन्यता मानली होती.
मुल्डरने लाराप्रती आपला आदर व्यक्त करताना संघाचा डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या कृतीचे अवघ्या जगातून कौतुक करण्यात आले. तसेच काहींनी हा निव्वळ मूर्खपणा असल्याचीही टीका केली होती. तसेच ज्या लाराप्रेमासाठी मुल्डरने जी खिलाडूवृत्ती दाखवली त्या लारानेही त्याचे कौतुक केले. मुल्डरनेही या विक्रमानंतर लाराशी संवाद साधला तेव्हा मीसुद्धा माझा वारसा निर्माण करत असल्याचे लाराने सांगितले. तू विक्रम मोडायचा प्रयत्न करायला हवा होता. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. भविष्यात पुन्हा तुला अशी संधी मिळावी आणि तू विक्रम मोडावे, असेही लारा म्हणाल्याचे मुल्डरने सांगितले. लाराचे मत वेगळे असले तरी माझा निर्णय योग्य असल्याचे मुल्डर म्हणाला. माझ्यासाठी खेळाचा सन्मान राखणे सर्वात अधिक महत्त्वाचे आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान मुल्डरला लाराचा 400 धावांचा विश्वविक्रम मोडण्याची सुवर्ण संधी होती, मात्र त्याने उपाहारादरम्यान डाव घोषित केला. त्यावेळी तो वैयक्तिक 367 धावांवर नाबाद होता. डाव घोषित केल्यामुळे मुल्डर विश्वविक्रमापासून 33 धावा दूर राहिला. त्याच्या या कृतीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List