FIFA साठी अपात्र ठरलेला इटली आता T-20 World Cup गाजवणार! पहिल्यांदाच वर्ल्ड कपसाठी पात्र
फुटबॉलमध्ये 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या इटलीचा संघा आता क्रिकेटच्या दुनियेत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. इटलीचा संघ पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. पुढच्या वर्षी हिंदुस्थान आणि श्रीलंकामध्ये होणाऱ्या ICC Men’s T20 World Cup मध्ये इटली खेळताना दिसेल. युरोपियन पात्रता फेरीत इटलीने दमदार कामगिरी करत हा ऐतिहासिक कारनामा केला आहे.
फुटबॉलमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारा इटलीचा संघाने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. परंतु मागील सलग दोन वेळा हा संघ FIFA वर्ल्ड कप साठी अपात्र ठरला आहे. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी सुद्धा इटली क्वालिफाय होऊ शकला नाही. परंतु आता क्रिकेटच्या दुनियेत इटलीने टी20 वर्ल्ड कपच तिकीट पक्क केलं आहे. त्यामुळे फुटबॉल वेड्या इटलीचा संघ क्रिकेटच्या मैदानावार डंका वाजवणार का? हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. युरोपियन क्वालिफायरमधील शेवटच्या सामन्यात इटलीला नेदरलॅंडने पराभवाची धुळ चारली. परंतु रन रेटच्या आधारावर इटलीने क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावल्यामुळे नेदरलँडसह इटलीसुद्धा टी20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List