राजकीय हेतूने कारवाई, ईडीच्या आरोपपत्रावर रोहित पवार यांची टीका

राजकीय हेतूने कारवाई, ईडीच्या आरोपपत्रावर रोहित पवार यांची टीका

ईडीने राजकीय हेतूने विरोधात कारवाई होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करत ईडीने रोहित पवार यांच्यावर मनी लाँडरिंग आरोप केला. मात्र पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दखल करून ही ईडीकडून आरोप पात्र दाखल करण्यात आलं आहे, मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप ईडीकडून आरोपपत्रात करण्यात आला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना रोहित पवार असं म्हणाले आहेत.

आज पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार म्हणाले आहेत की, “50.2 कोटी रुपयांना बारामती अ‍ॅग्रोने हे टेंडर घेतलं. 100 लोकांची नावे यात घेतली होती. यात अनेक लोक होती. ईडीने जी एफआयआर दाखल केली यात 97 लोकांची नावे आहेत. नाबार्डने जो रिपोर्ट केला होता, त्यात माझ्या एकट्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न ईडीच्या माध्यमातून झाला. हा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातूनच झाला आहे.” ही लढाई आपण जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;