देशात XFG कोरोना व्हेरिएंटचा वेगाने प्रसार, राज्यातही वाढली रुग्णांची संख्या
हिंदुस्थानात कोरोना विषाणूचा नवा प्रकार XFG वेगाने पसरत असून, देशभरात आतापर्यंत 206 प्रकरणांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात (89) आढळली असून, त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल (49), तमिलनाडू, केरळ, गुजरात आणि दिल्ली येथेही रुग्ण आढळले आहेत.
XFG हा ओमिक्रॉन उपप्रकाराचा एक रिकॉम्बिनेंट व्हेरिएंट आहे, जो LF.7 आणि LP.8.1.2 या दोन जुन्या व्हेरिएंटच्या संमिश्रणातून तयार झाला आहे. हा प्रकार सर्वातआधी कॅनडामध्ये आढळला आणि आता तो हिंदुस्थनसह 38 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) XFG ला निरीक्षणाखालील सात व्हेरिएंट्सपैकी एक म्हणून वर्गीकृत केले आहे.
हिंदुस्थानी SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) नुसार, महाराष्ट्रात 89, तमिलनाडूत 16, केरळमध्ये 15, गुजरातमध्ये 11 आणि आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल येथे प्रत्येकी 6 प्रकरणे नोंदली गेली आहेत. याशिवाय, दिल्ली, राजस्थान, पंजाब येथे प्रत्येकी 2, तर तेलंगणा आणि हरियाणात प्रत्येकी 1 प्रकरण आढळले आहे.
XFG ची काय आहेत लक्षणे?
XFG ची लक्षणे सौम्य असून, सामान्य सर्दी-खोकला, ताप, घसा खवखवणे, थकवा आणि स्नायुदुखी यांचा समावेश आहे. वृद्ध, लहान मुले आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना याचा धोका जास्त आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List