Jammu Kashmir – एसयूव्ही कार 600 फूट दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
जम्मू कश्मीरमधील रामबन येथे एक एसयूव्ही कार 600 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. उखरल पोगल परीस्तान परिसरातील सेनाबठीजवळ हा अपघात झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पावसामुळे कार रस्त्यावरून घसरली आणि 600 फूट खोल दरीत कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातात तौकीर अहमद (20) याचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेत असताना मोहम्मद रफिक (40), अब्दुल लतीफ (40) आणि अजाज अहमद (20) या तिघांचा वाटेतच मृत्यू झाला. तर शकील अहमद (24) याचा श्रीनगरमधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अहमद (25) याची प्रकृती चिंताजनक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List